मुंसियारीचे मेसर कुंड-एक कौटुम्बिक ट्रैक

हिमालय पर्वत श्रृंखलेत वसलेलं,उत्तराखंड च्या पिथोरागड जिल्ह्यातील मुंसियारी हे एक छोटे से ठीकाण.इथे दाटीदाटीने उभ्या असलेल्या ओकच्या घनदाट जंगलात,मुंसियारितील मेसर कुंडहे एक दिवसाच्या फेमिली ट्रेक करिता परफेक्ट डेस्टिनेशन आहे.

family_travel_blog_मेसर_कुंड_meesar_kund_kumaon_himalayas

मुंसियारीच्या चहुबाजूला छोटे,मोठे ट्रेक किंवा सहली करण्या करिता खूप जागा आहेत.खर सांगायचे म्हणजे आमच्या सरमोलीतील अकरा दिवसाच्या वास्तव्यातील बहुतांश वेळ तिथल्या स्थानिक लोकांशी गप्पा मारण्यात,फूलपाखरांच्या मागे धावण्यात किंवा तिथले जुने म्युझियम पहाण्यातच कसा गेला हे कळले नाही.आणि काहीच करायचे नसले तर एखादे आवडीचे पुस्तक घेवून,निसर्गाच्या सानिध्यात कुठेही लोळत,वाचन करायचे.लिखाण करायला पण अगदि उपयुक्त वातावरण.

सरमोली ला आम्ही तेथील एका स्थानिककुटुम्बातरहात होतो ( होमस्टे) .तेंव्हा एक दिवस आमच्या ९ आणि ११ वर्षांच्या दोन चिमुकल्यांबरोबर मेसर कुंडचा लहानसा ट्रेक करायचे ठरविले. मेसरकुंडला तिथल्या बोली भाषेत महेश्वरी कुंड किंवा मिसार कुंड असेही म्हणतात.

ओक आणि र्होडोडेंड्राँन ( मोठ्या झुबकेदार फुलांचे एक सदा हरित असे फूल झाड ) च्या झाडांमधून एक छानशी खडकाळ वाट तुम्हाला मेसर कुंडला घेवून जाते.

जे तब्बेतीने उत्तम आहेत त्यांच्या करिता हा एक सरळ सोपा ट्रेक आहे नाहीतर मात्र जरा धापा टाकतच तुम्ही कुंडापर्यंत येवून पोहचता.

family_travel_blog_मेसर_कुंड_meesar_kund_kumaon_himalayas
The rejuvenated Mesar Kund!

मेसर कुंडच्या आधी तुम्हाला एक लहानसे कुंड दिसेल.इथे थोडा वेळ थांबून विसावा घेवून,ताजे तवाने होवून पुढच्या ट्रेक करिता निघू शकता. मेसर कुंड येथून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे.

जळू पासून सावध रहा

तुम्ही जर पावसाळ्यात हा ट्रेक करणार असाल तर आपल्या पँटस् मोज्यांच्या आत घालायला विसरु नका. नाहीतर ह्या जळवांकरिता,तुम्ही एक अनैच्छिक ब्लड डोनर व्हाल. घाबरू नका.लगेच त्यांच्यावर मीठ घाला त्या पार विरघळून जातील आणि तुम्ही आपली सुटका करून घ्या.

कुंडाजवळील उत्सव

दरवर्षि बुध्द पौर्णिमेला म्हणजे साधारण मे महिन्यात ह्या कुंडा जवळ मेसर वन प्रदर्शनकिंवा इथल्या बोलीभाषे प्रमाणे मेसर वन कौैटिक साजरे केले जाते.

(बे)जवाबदार पर्यटक

इतक्या रम्य जंगलात निसर्गाचा आनंद घेत असताना ,पायात येतात पाण्याच्या रिकाम्या बाटल्या,बीअरचे रिकामे क्यान नाहीतर चिप्स् आणि बिस्किटाचे रेपर्स.ते नकळत तुमच्या मनालासुध्दा बोचतात.”जंगलातून किंवा पर्वतांवरून फिरुन येताना ते तुम्ही पाहिले त्यापेक्षा ही स्वच्छ करूनच तिथून निघाहा मंत्र लक्षात ठेवून मुलानी परत येताना जमेल तसा,जमेल तेव्हढा कचरा गोळा करुन आणला.

तुम्ही कधी अशा एका छानश्या ट्रेक वर गेला आहात का? तुमचे अनुभव वाचायला आम्हाला नक्कीच आवडतील.तेंव्हा कमेंट करायला विसरु नका.तुम्ही एफ.बी. आणि इंस्टाग्राम वर मला भेटू शकता.

You can read this post in HINDI here and in English here.

Leave a Comment